मुंबई प्रतिनिधी सुभाष मुळे तेज न्यूज
कुर्ला पूर्व येथील स्वामी विवेकानंद शाळेत दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील ५१ एन सी सी शिक्षकांना असोसिएट एन सी सी ऑफिसर्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मुंबईतील जॉय एक्सप्रेस या साप्ताहिकाचे संपादक गणेश हिरवे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हिरवे मागील अनेक वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत आहेत.शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख असून कायमच ते सामाजिक कार्यात गुंतलेले असतात.दररोज विविध वर्तमान पात्रांमध्ये त्यांच्या बातम्या येत असतात.आदर्श वृत्तपस्रलेखक म्हणूनही त्यांचा अनेकदा सन्मान झाला असून आतापर्यंत त्यांना १८६ पुरस्कार मिळाले असून कोणताही पुरस्कार मिळाला, सन्मान झाला की अजून जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा मिळते असे हिरवे यांनी पुरस्कार स्वीकारल्या नंतर सांगितले.
ब्रिगेडियर शिरीष ढोबळे, कॅप्टन आशिष दामले, कॅप्टन मनोज भामरे, मुख्याध्यापिका सुमन सिंह आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन एन सी सी चे प्रमुख विश्वनाथ पांचाळ, संदीप गोसावी यांनी केले होते.

