पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
चारे ता. बार्शी येथे भारत स्काऊट, गाईड जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी कौठाळी ता.पंढरपूर येथील राजनंदिनी माध्यमिक विद्यालयाच्या कांतारा देखाव्यास प्रथम क्रमांक मिळाला. या भव्य अशा मेळाव्यात सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ७० शाळांनी सहभाग घेतला होता, त्यामुळे स्पर्धेची पातळी अत्यंत चुरशीची ठरली.या मेळाव्यातील शोभायात्रा हे सर्वांचे विशेष आकर्षण ठरले. या शोभायात्रेत राजनंदिनी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘कांतारा’ चित्रपटातील आदिवासी संस्कृती, निसर्गपूजन व परंपरेचा सजीव देखावा सादर करत केवळ देखावा न मांडता भारतीय संस्कृतीची मुळेच जणू उभी केली.
या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष अनिल होळकर,सचिव,मुख्याध्यापक, ग्रामस्थ, तसेच पंढरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लिगाडे व वाखरी केंद्राचे केंद्रप्रमुख अण्णासाहेब पवार यांनी विद्यार्थ्यांचे आणि शाळेचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांना सागर शिंदे,ऋतुराज नागटिळक यांचे मार्गदर्शन लाभले .

