भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
आज दिनांक २७/१२/२०२५ वार शनिवार रोजी वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर,भाळवणी प्रशालेतील छोटा शिशू,मोठा शिशू व इयत्ता पहिली ते सातवीमध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा आज विनादप्तर शनिवार या उपक्रम अंतर्गत दरवर्षी प्रमाणे क्षेत्रभेट व वनभोजन आपल्या परिसरातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.सा.कारखाना व विठ्ठल मंदिर,वसंतबाग,या ठिकाणी करण्यात आला.
यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांना ऊसापासून साखर तयार होण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने असते हे प्रत्यक्षात संपूर्ण कारखान्यात फिरून दाखवण्यात आली तसेच सर्वांना तयार झालेली साखर खायला देण्यात आली.
यानंतर श्री विठ्ठल मंदिरात वनभोजन करताना प्रशालेकडुन विद्यार्थ्यांना गोड खाऊ जिलेबी वाटप करण्यात आली व विद्यार्थ्यांना गोल करून वनभोजनाचा आनंद घेतला तसेच कारखाना प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना ऊसाचा रस देण्यात आला व यावेळी वसंत बागेत सर्व विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळत अतिशय आनंदित वातावरणात हा उपक्रम पार पडला
सदर उपक्रम प्रशालेचे सचिव एच.आर.जमदाडे ,प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एल.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी प्रशालेतील सर्व सहशिक्षक,सहशिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

