पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज दि. ०५/१२/२०२५ रोजी प्रशांत डगळे , सहा. पोलीस अधीक्षक, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांना गोपनीय माहितीच्या आधारे बातमी मिळाली की, काही इसमांनी पंढरपुर शहर परिसरातील इसबावी परिसरातील ५२ एकर परिसराकडे जाणारे सिमेंट रोडचे पुर्वेकडील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात झुडूपाच्या आडोशाला काही अंतरावर मोकळया जागेमध्ये, भीमा नदी पात्रातुन अवैधरित्या वाळु उत्खनन करून त्या वाळुचा साठा केला आहे.
अशी बातमी मिळालेने पंढरपुर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोहेकॉ १८६ निलेश रोंगे, पोना/४२७ विनोद सुग्रीव शिंदे व पोकों/२११० शिवशंकर हुलजंती असे संबंधित ठिकाणी जावुन बातमीतील आशयाप्रमाणे खात्री केली व त्याठिकाणी रेकी करणे करीता एक लाल रंगाची चारचाकी स्विफट कार आणि वाहनाच्या शेजारी ०२ ते ०३ इसम उभे होते. थोड्या वेळाने एक टिपर त्या ठिकाणी आला आणि जेसीबीच्या सहाय्याने त्यामध्ये वाळू भरायला सुरुवात केली.
त्यावेळी संशय आलेने जेसीबी ड्रायव्हर व टिपर ड्रायव्हर वगळता इतर ०२ दोघेजण रेकी करणा-या लाल रंगाच्या चारचाकी स्विफट कार मधुन पळून जात होते त्यावेळी पोलीसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, त्यांनी वाहन न थांबवता ते पळून गेले त्याचवेळी इतर पोलीसांनी जेसीबी व टिपर ड्रायव्हरला पकडले. त्यानंतर काही वेळाने पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडील पोसई पिसाळ, पोकों धनाजी मुटकुळे व पोहवा विनोद चौगुले यांनी पाठलाग करून लाल रंगाची स्विफ्ट कार पकडली, त्यातील चालक तर दुस-या इसमास जागीच पकडले. त्याचे नाव पत्त्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी त्यांची नावे १) सिध्दनाथ भागवत इंगोले, रा. गादेगाव, ता. पंढरपूर असे सांगितले. लाल रंगाची स्विफट कार व टिपर वाहनाच्या मालकाबाबत त्यास विचारणा केली असता, २) महेश तानाजी शिंदे रा. इसवावी असे असल्याचे सांगितले तसेच तेथे पकडण्यात आलेल्या जेसीबी ड्रायव्हर व टिपर ड्रायव्हर यांना त्यांचे नाव पत्ता विचारणा केली असता, त्यांनी त्यांची नावे अनुकमे ३) हनुमंत धनाजी जाधव रा. वाखरी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, ४) परमेश्वर महादेव माने रा. बोहाळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले.घटनास्थळावर मिळून आलेल्या वाहनांचे व मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे-
१) २५,००,०००/- एक पिवळ्या रंगाचा जेसीबी विना नंबरचा
२) २०,२४,०००/- एक टाटा कंपनीचा पांढरे रंगाचा हायवा टिपर विना नंबरचा त्यामध्ये सुमारे ०४ ब्रास वाळुसह ३) ०७,००,०००/- एक लाल रंगाची स्विफट कार विना नंबरची जु.वा. किं.अं.४) १०,०००/- एक सॅमसंग कंपनीचा काळया रंगाचा मोबाईल जु.वा. किं.अं.५२,३४,०००/- असा मुददेमाल जप्त करणेत आला असुन पुढील तपास पोसई श्रीकांत घुगरकर हे करीत आहे.
सदरची उल्लेखनीय कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी , (भा.पो.से) अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग प्रशांत डगळे (भा.पो.से) व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर यांचे कार्यालयाकडील पोहेकॉ १८६ निलेश रोंगे, पोना/४२७ विनोद सुग्रीव शिंदे व पोकों/२११० शिवशंकर हुलनंती, पोका / राहुल लोंढे तसेच पंढरपुर शहर पोलीस ठाणेकडील पोसई पिसाळ, पोकों धनाजी मुटकुळे व पोहवा/विनोद चौगुले यांनी केली आहे.

