पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली . या निमित्त भिडे वाडा ते फुले वाडा अशी महारॅली 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता माळी महासंघ आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती माळी महासंघ किसान आघाडी चे प्रदेश अध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी दिली आहे.
माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे , प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे यांच्या नेतृत्वात 2014 पासून सतत दरवर्षी माळी महासंघ पुणे येथे फुले दाम्पत्य सन्मान दिन रॅली काढून साजरा करीत आहे . भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी सतत नऊ वर्ष माळी महासंघ आणि सर्व समाज बांधवांनी प्रयत्न केल्यावर त्यास यश मिळाले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून स्मारकाचे काम सुरू केले आहे.
यावेळी फुले दाम्पत्यांना अभिवादन करण्यासाठी त्याच बरोबर पुणे येथील मंडई मेट्रो स्टेशन ला महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव दिल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या रॅली चे संयोजक हिरामण भुजबळ हे असून संपूर्ण रॅली ची संपुर्ण जबाबदारी दिपक जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी यशस्वी पने पार पाडत आहेत.
या महारॅली साठी माळी महासंघाचे राष्ट्रीय सचिव रविंद्र अंबाडकर , प्रदेश सरचिटणीस नानासाहेब कांडलकर , विश्वस्त संतोष जमदाडे, कैलास महाजन , राष्ट्रीय उपाध्यक्ष काळूराम अण्णा गायकवाड , संतोष अण्णा लोंढे , राष्ट्रिय महिला अध्यक्षा वनिता लोंढे , रॅली संयोजक हिरामण भुजबळ, रॅलीचे प्रमुख दिपक जगताप, प्रदेश सचिव चंद्रशेखर दरवडे , महिला प्रदेश अध्यक्षा सौ. गायित्री लडकत , स्मिता लडकत यांच्या सह महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने दरवर्षी उपस्थित राहत असतात.
या महारॅली साठी सोलापूर जिल्हातून मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन माळी महासंघ किसान आघाडी चे प्रदेश अध्यक्ष शंकरराव वाघमारे , माळी महासंघ चे विश्वस्त भारत माळी , सोलापूर चे जिल्हाध्यक्ष सुधाकर जांभळे यांनी केले आहे.

