वैराग प्रतिनिधी तेज न्यूज
सत्यशोधक डॉ.बाबा आढाव यांचे पुणे येथील पुणा हॉस्पिटलमध्ये दि. 8 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान निधन झाले. संपूर्ण महाराष्ट्रातील हमाल, मापाडी, श्रमजीवी, रिक्षाचालक, टॅम्पो मालक-चालक, कागद-काच-कचरा गोळा करणारे कामगार इवढेच नाही तर संपूर्ण राज्यासह देशातील नाही रे वर्गाचे नेतृत्व करणारे, त्यांना न्याय देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले असे सत्यशोधक डॉ.बाबा आढाव यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सर्वांचा आधारवड हरपला आहे. दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने त्यांनी सुरु केलेली कामगार चळवळ आपणास अधिक जोमाने पुढे न्यायची आहे. यासाठी सर्व कामगारांनी एकत्र येवून हा लढा एकजुटीने लढायचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आव्हान महाराष्ट्र राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे सहचिटणीस तथा सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी केले आहे.वैराग येथील जिल्हा हमाल-मापाडी पंचायतीच्या जिल्हा बैठकीप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गोरख जगताप, भीमा सिताफळे, जिल्हा सचिव संतोष सावंत, माजी अध्यक्ष ताजुद्दीन शेख, नागन्नाथ खंडागळे, प्रकाश उपासे, शिवानंद पुजारी, हरिभाऊ कोळी, पंढरपूरचे अध्यक्ष सिध्देश्वर ढोले, उपाध्यक्ष गजानन भुईटे, उत्तरेश्वर गोफणे, दत्ता मुरुमकर, सिध्दू हिप्परगी, किरण मस्के, ज्ञानेश्वर गोसावी, गजानन गावडे, उमेश मोरे, बार्शी कृ.उ.बाजार समितीचे कामगार संचालक गजेंद्र मक्ते आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.
यावेळी ताजुद्दीन शेख, शिवानंद पुजारी, भीमा सिताफळे, संचालक गजेंद्र मक्ते आदींनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी सत्यशोधक डॉ.बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहन्यात आली. तसेच बाशी कृ.उ.बाजार समितीवर कामगार संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल गजेंद्र मक्ते यांचा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागत संतोष माने यांनी तर प्रास्ताविक व सुत्रसंचालन विजय वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैरागचे अध्यक्ष नागन्नाथ नवले, उमेश शिंगाडे, धनाजी वाघ, नागेश ठोंबरे व सर्व कामगार बांधवांनी परिश्रम घेतले.

