करमाळा प्रतिनिधी तेज न्यूज
नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केलेल्या मा. आ. जयवंतराव जगताप यांच्यामुळे या निवडणुकीला पक्षीयरंग चढला होता. मात्र सावंत गटाने करमाळा शहर विकास आघाडीच्या बॅनर वर स्थानिक पातळीवर निवडणूक लढविण्याचे ठरवून नगराध्यक्ष पदासह सर्वच्या सर्व 20 जागांवर उमेदवार उभे केले होते.
त्यामुळे ही निवडणूक तिरंगी तर झालीच मात्र स्थानिक आघाडीने पक्षीय गटांना धूळ चारल्याने सावंत गटाचा विजय विशेष चर्चिला गेला. भाजपाशी युती न झाल्याचे कारण पुढे करत राष्ट्रवादी अजित पवार गटानेही नगराध्यक्षपदाच्या भाजपा उमेदवार सौ. सुनीता देवी यांना पाठिंबा जाहीर करत राष्ट्रवादीच्या बॅनरखाली सात तर राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून एक असे आठ उमेदवार उभे केले असले तरी या निवडणुकीत या सर्वांचा सपशेल पराभव झालेला आहे.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यांना पडलेली मते
१) मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी) ६५२० मते
२) सुनिता कन्हैयालाल देवी (भाजपा) ४६८० मते
३) महानंदा जयवंतराव जगताप (शिवसेना) ४५५७ मते
४) भावना भद्रेश गांधी (रासप) १३१ मते
५) वाघमारे प्रियंका सिद्धांत (अपक्ष) ७० मते
प्रभाग निहाय विजयी उमेदवार आणि त्यांना पडलेली मते
प्रभाग – १
जबीन मुलाणी (करमाळा शहर विकास आघाडी) १०५७ मते
रवी जाधव (कशविआ) १०२५ मते
प्रभाग २
संजय सावंत (कशविआ) १४१६ मते
जोत्स्ना लुणीया (कशविआ) १२३० मते
प्रभाग ३
निर्मला गायकवाड (भाजपा) ८९५ मते
पुजा इंदलकर (कशविआ) ७०२ मते
प्रभाग ४
स्वाती फंड (भाजपा) १०१० मते
अतुल फंड (भाजपा) १२३१ मते
प्रभाग ५
साजीदा कुरेशी (शिवसेना) ४९३ मते
विक्रमसिंह परदेशी (कशविआ) ६७८ मते
प्रभाग ६
सुवर्णा आलाट (शिवसेना) ७०५ मते
प्रशांत ढाळे (शिवसेना) ९३४ मते
प्रभाग ७
अश्विनी अब्दुले (शिवसेना) ९१९ मते
युवराज चिवटे (शिवसेना) ७३५ मते
प्रभाग ८
सुनिता ढाणे (भाजपा) ८२५ मते
दिपक चव्हाण (भाजपा) ४९५ मते
प्रभाग ९
लता घोलप (भाजपा) ५४६ मते
सचिन घोलप (भाजपा) ५४६ मते
प्रभाग १०
संदिप कांबळे (कशविआ) ६१० मते
चैताली सावंत (कशविआ) ६४६ मते
निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांनी मतमोजणीची चोख व्यवस्था ठेवली होती. मतमोजणी दरम्यान आणि निकाला नंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा आणि पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

