माढा प्रतिनिधी अरुण कोरे
कुर्डुवाडी न.पा.निवडणूकीच्या आजच्या निकालात कुर्डुवाडीत ट्विस्ट झाला असून शिवसेना उबाठा गटाच्या प्रथम पासूनच आपल्या किंग मेकर सासरे कै.के.एन.भिसे यांची पुण्याई, शैक्षणिक,सामाजिक,अध्यात्मिक कार्याच्या जोरावर अतिशय चुरशीच्या लढाईत एक आश्वासक चेहरा म्हणून जयश्री भिसे यांच्या विरोधी उमेदवार राष्ट्रवादी अजीत व रिपाइं आठवले गटाच्या सौ.सुरेखा गोरे पेक्षा ६५५ मते अधिक घेऊन विजयी झाल्या.
शिवसेनेच्या वाघीण म्हणून उबाठा गटाच्या नगराध्यक्षपदी सौ.जयश्री भिसे निवडून आल्या असल्या तरी त्याचं बहुमत हुकून ५ च उमेदवार निवडून आले आहेत.राष्ट्रवादी रिपाइंचे १३ नगरसेवक निवडून आले असून त्याचे बहुमत झाले आहे.शिवसेना शिंदे गटातून सौ.वनिता सातव व अपक्ष(दोघे पूर्वाश्रमीचे शिवसेना उबाठा) म्हणून शकील तांबोळी विजयी झाले आहेत.
एकंदरीत निवडणुकीचा मागोवा घेता सौ.वृषाली महेश गांधी या सर्वाधिक ९७६ मते मिळवून विजयी झाल्या आहेत.तर सौ. सरस्वती संतोष क्षिरसागर या २७३ इतकी कमी मते मिळवून विजयी झाल्या आहेत.तर एकूण २० पैकी १२ जागांवर महिला नगरसेविका निवडून आल्याने नगराध्यक्षासह १३ जणी महिला राज आले आहे.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात...
१) सौ.सविता सुभाष जगताप (८२७) २) आनंद नरसू कदम(६५२)३) अमयकुमार विश्वंभर माने(८२२)४)शाहिस्ता शाबीर चाऊस (७५२)५)सौ.सरस्वती संतोष क्षिरसागर (२७३)६)सौ.अंजली विशाल गावडे (३३१)७)सौ.पल्लवी हरिश्चंद्र कांबळे (७८१)८)संजय पांडुरंग टोणपे(५०८)९)सौ.भाग्यश्री श्रीकांत पाटील(८०१)१०)सौ.अबोली सागर चौधरी (७४८) ११) डॉ.मोहसीन मौलाली मकणू(७१८)१२)सौ.स्नेहा सचीन गवळी (८२७)१३) जगन्नाथ यशवंत क्षिरसागर (५९३)१४)सौ.रेश्मा विशाल गोरे (६०८)१५) शकील बशीर तांबोळी (७६१अपक्ष)१६)सौ.वृषाली महेश गांधी (९७६ सर्वाधिक मते)१७)सौ.वनिता अशोक सातव (६०७)१८)वृषीपाल कृष्णपाल वाल्मिकी (५५२)१९)सौ.शुभ्रा अतुल गोरे (७४२)२०)माजी नगराध्यक्ष समीर जब्बार मुलाणी (६२५)
नगराध्यक्षा सौ.जयश्री भिसे यांनी विजयानंतर शहरातून तर नगरसेवकांनी आपापल्या वार्डातून मिरवणूका काढल्या होत्या.

