सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बारा नगरपालिकांपैकी भारतीय जनता पार्टी कडे चार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे तीन तीर्थक्षेत्र विकास आघाडी दोन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एक आणि स्थानिक विकास आघाडी एक असे बलाबल विजयी झाले आहे.
यामध्ये अक्कलकोट तालुक्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बाजी मारली असून या निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला असून मिलन कल्याणशेट्टी यांनी ८,५५२ मतांनी नगराध्यक्ष पद जिंकले आहे. भाजपाचे २२ नगरसेवक विजयी झाले असून काँग्रेसचे २ व शिवसेना शिंदे गटाचा १ नगरसेवक निवडून आला आहे. या निकालामुळे अक्कलकोट नगरपरिषदेत भाजपाचे स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
तसेच मैंदर्गी नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. यावरून कल्याणशेट्टी यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले.
सर्वांचे लक्ष होते ते दुधनी नगरपरिषदेकडे. तिथे मात्र माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे यांनी बाजी मारली असून भाजपकडून दुधनी ताब्यात घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा दुधनी वर सिद्ध झाले आहे.


