पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
जनजागृती अभियान पंढरपूर (सोलापूर) २८ डिसेंबर २०१५ रोजी पंढरपूर येथे,चलो नागपूर साठी महिला प्रतिनिधींच्या उपस्थितीत नागपूर बद्दल माहिती सांगण्यात आली.
ही बैठक अनेक सामाजिक उपक्रम ,आणि शिंपी समाज संघटन ,चलो नागपूर ही एक सर्व पोट जातीय शिंपी समाजासाठी एक संघटनात्मक चळवळच असणार आहे. यामध्ये नागपूर येथील महासंमेलनाविषयी कार्यक्रम कसा असेल .आणि उद्देश काय आहेत .इत्यादी बद्दल माहिती देण्यात आली.
या बैठकीस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आणि पंढरपूर हे एक आध्यात्मिक ठिकाण असून महिलांनाही अन्यायाने साधारण महत्त्व आहे यामध्ये महिलांसाठी अध्यात्मिक शिक्षणासाठी संधी निर्माण करणाऱ्या संस्था उपलब्ध असाव्यात अशा अनेक प्रश्नाबाबत चर्चा झाली शिंपी समाजातील उत्साही महिलांनी आपली मते नोंद केली अशा अनेक प्रश्नांबाबत महासंमेलनात ही चर्चा होईल अशी आशा आहे असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सर्व शिंपी पोट जातीय विविध प्रांतातून एकत्र येण्याची गरज आहे.
या बैठकीचे नियोजन सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष धनंजय काकडे व जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पिसे यांनी केले.यावेळी जास्त संख्येने महिला सदस्य सौ.सुनिता जंवजाळ,सौ.अरूंधती काकडे,सौ.अनुजा जवंजाळ,सौ.माधुरी काकडे,सौ.ज्योती घट,सौ.मनिषा हैंद्रे, सौ.मीना चांडोले,सौ.कुसूम माणकुसकर,सौ.आरुणा बुरकुल,सौ.सुप्रिया काकडे इत्यादींनी आपला सहभाग नोंदवला .
या बैठकीचे नियोजन केले यावेळेस महासंमेलन आयोजन समितीचे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष मिनलताई कुडाळकर, पश्चिम महाराष्ट्र मुख संघटक संतोष मुळे, प्रश्विम महाराष्ट्र महिला अध्यक्ष शारदा जौंजळ, प्रश्विम महाराष्ट्र अध्यक्ष दिनकर पतंगे,माळशिरस तालुकाध्यक्ष दिलीप बांगाळे हे पदाधिकारी उपस्थित होते.

