भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शनिवार दिनांक 27 /12/ 2025 रोजी सकाळी 11 वाजता ग्राहक दिनानिमित्त ग्राहक प्रबोधन शिबिराचे आयोजन केले आहे.
हा कार्यक्रम सरपंच रणजीत जाधव यांचे अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास, उपसरपंच नितीन शिंदे, ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल,जिल्हा सचिव सुहास निकते
तसेच या कार्यक्रमास महावितरणचे अलोरकर,तलाठी एस एन शिनगारे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता एल एम मिले , पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता चके, ग्रामविकास अधिकारी डी एम वाघमारे,कृषी सहाय्यक सागर गव्हाणे, शुभम गॅस एजन्सीचे विक्रेते विजय शिंदे, रेशन दुकानदार, ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष नंदकुमार देशपांडे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका पंढरपूर शाखा भाळवणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

