सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यांची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग ९ मधून ॲड. सुरेश गायकवाड हे ९-ड या सर्वसाधारण जागेवरती निवडणूक लढू इच्छित आहेत.
ॲड.सुरेश गायकवाड हे सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष होते सध्या ते विधी सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून वकिलांचे संघटन करत असतात .याशिवाय शिवसेनेच्या शिव विधी व न्यायसेनेचे ते जिल्हाप्रमुख देखील आहेत. शिवाय कर्णीक नगर येथील जागृत शनेश्वर देवस्थान समितीचे ते संस्थापक अध्यक्ष सुध्दा आहेत .विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून ते गेली ३० वर्षांपासून अक्कलकोट रोड परिसरात सक्रीय सामाजिक काम करत आहेत.
मंगळवारी वकिलांच्या शिष्टमंडळाने शासकीय विश्रामगृहात शिवसेना संपर्क नेते चंद्रकांत खैरे यांची व UBT.निवडणुक समिती सदस्या अस्मिता गायकवाड, उपनेते शरद कोळी यांच्यासह जिल्हाप्रमुख अजय दासरी जिल्हा जिल्हाप्रमुख गणेश वानकर, धनंजय ढेकळे व संतोष पाटील यांची भेट घेऊन ॲड.सुरेश गायकवाड यांना महापालिका निवडणुकी करिता उमेदवारी द्यावी असे लेखी पत्र शिष्टमंडळाने दिले . यामध्ये ॲड .गायकवाड यांच्या कार्याचा परिचय देखील देण्यात आला आहे.
एक उच्च शिक्षीत चेहरा महापालिकेत पाठवण्यासाठी नेतेमंडळाने विशेष लक्ष घालावे अशी आग्रही मागणी ॲड. जयंत शिंदे, ॲड.युवराज आवाडे, ॲड.सुनिल क्षीरसागर, ॲड.दादासाहेब जाधव, ॲड.राहुल गायकवाड, ॲड. करण भोसले , नागेश शिरूर, जयंत कदम ,प्रा.अनिल लोंढे , मदन जोशी काका आदींनी केली आहे.



