पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 69 व्या " "महापरिनिर्वाण दिनानिमित्त "श्री. रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व ज्यूनियर कॉलेज पंढरपूर येथे संस्थापक सचिवा मा.सौ. सुनेत्राताई पवार यांचे मार्गदर्शनाखाली प्राचार्य सौ. नंदिनी गायकवाड यांचे शुभहस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले. यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक गणेश डुबल म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाज सुधारक व अर्थशास्त्रज्ञ असे थोर महापुरुष होते. त्यांनी दलित व वंचित समाजाच्या हितासाठी बहुमोल असे कार्य केले. त्यांची ओळख म्हणजे स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अशा थोर महापुरुषास भारताने सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला. असे सांगून दलित व महिलांच्या हक्कासाठी लढा देऊन जातीय भेदभावा विरुद्ध आवाज उठविलयाचे सांगितले.
तर प्राचार्य नंदिनी गायकवाड म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका , संघटित व्हा, संघर्ष करा असा महत्त्वाचा संदेश देऊन मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून बुद्धिमत्तेचा विकास करणेचे सांगितले. पुढे धार्मिक आणि सामाजिक रूढी सोडून नवीन विचारांना स्वीकारून मुलांनी शिक्षणाच्या बळावर स्वतःला सक्षम करण्याचा संदेशही दिल्याचे सांगितले.
तसेच यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांनीही त्यांचे जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी,पालक यांचे बरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी बोडके, कुमुदिनी सरदार, पुंजाजी ढोले यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इरफान शेख यांनी केले तर आभार विजय भंडारे यांनी मानले.


