पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रो.डॉ. दत्तात्रय काळेल यांनी लिहिलेल्या व सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या शरद पवार आणि पुलोद चा प्रयोग या पुस्तकाचे प्रकाशन शरदचंद्रजी पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्ताने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले .
या पुस्तकामध्ये शरदचंद्रजी पवार यांची लहान वयापासून ते सध्याच्या कालावधीपर्यंत जडणघडण कशा पद्धतीने झाली व त्यांचा सर्वात मोठा राजकीय निर्णय म्हणजे 1978 संयुक्त महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षांना एकत्रित करून केलेला पुरोगामी लोकशाही दलाच्या शासनाचा प्रयोग होय. देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी केलेल्या कामगिरीचा सविस्तर आढावा या पुस्तकामध्ये सत्य स्थितीवर आधारित लिहिला गेला आहे.या कार्यक्रमांमध्ये शरदचंद्रजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयंत पाटील, माजी मंत्रीआमदार अनिल देशमुख, खासदार निलेश लंके, माजी मंत्रीमा. राजेश टोपे मा. आ.बाळासाहेब पाटील महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षक्षा रोहिणी खडसे, राज्य प्रवक्ते मा. महिबूब शेख महाराष्ट्र राज्य उद्योग व व्यापार उद्योग समूहाचे अध्यक्ष नागेश फाटे लोणारी समाज सेवा संघ मुंबईचे सचिव भरत बाड, उरणच्या राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर, पुण्याच्या नगरसेविका डॉ. सुलक्षणा शीलवंत, पुण्याचे युवा नेते प्रशांत काळेल व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख उपस्थित होते.

