भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेचे माजी विद्यार्थी विशाल गाजरे, संजय शिंदे, विवेक जाधव व सोपान क्षीरसागर यांची सैन्य दलात भरती झाल्याबद्दल व सुरेश अशोक बुरांडे यांची विद्युत सहाय्यक म्हणून निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक शशिकांत देशपांडे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल शिंदे उपाध्यक्ष आर के पवार व सदस्य अजित लिंगे शिक्षक चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना सत्कार मूर्तीनी कष्ट व प्रामाणिकपणाच्या जोरावर मिळालेल्या देशसेवेच्या संधी चे आम्ही सोनं करू व गावचे नाव रोशन करू अशी भावना व्यक्त केली .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक देशपांडे यांनी सांगितले की ' आजचा हा सन्मान सोहळा खऱ्या देशसेवेचा सोहळा आहे . देशाविषयी माझे पणाची व आपल्या पणाची भावना असेल तर सेवेची फलश्रुती अधिक होते अशी भावना व्यक्त केली .
यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

