सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ D1, रिजन १ च्या वतीने आयोजित रिजनल कॉन्फरन्स 'श्री समर्पण' मध्ये सोलापूरचे ख्यातनाम विधीतज्ज्ञ ॲड. आसिम ख्वाजा हुसेन बांगी यांना राज्यस्तरीय 'लायन्स विधीरत्न 2026 ' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हा सोहळा रविवार, ४ जानेवारी २०२५ रोजी सोलापूर येथील पुलगम पॅलेस फंक्शन हॉल येथे संपन्न होणार आहे.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
या सोहळ्याला महाराष्ट्राचे आध्यात्मिक गुरू आणि प्रेरणादायी व्याख्याते व माजी आयएएस अधिकारी इंद्रजीत देशमुख (सातारा) तसेच पुणे येथील माजी कलेक्टर मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उदघाटकपद लायन्स डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल एमजेएफ लायन डॉ. विरेंद्र चिखले (रत्नागीरी) भूषवतील.
याप्रसंगी प्रथम उपप्रांतपाल लायन राजेंद्र शहा , द्वितीय उपप्रांतपाल लायन डॉ. किरण कोराटे ( गडहिंगलज ), रिजन चेअरमन ॲड. श्रीनीवास कटकुर , रिजन सचिव चंद्रकांत यादव, रिजन कॉन्फरन्स चेअरमन एमजेएफ लायन अतुल सोनिग्रा आणि रिजन कोऑर्डिनेटर लायन प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांच्यासह अनेक माजी प्रांतपाल व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचे स्वरूप व निवड
पुरस्काराचे स्वरूप: लायन्सचा प्रतिष्ठित मोमेंटो, शाल, श्रीफळ, मोत्याचे माळ, आणि सन्मानचिन्ह.
निवडीचे कारण:
ॲड. आसिम ख्वाजा हुसेन बांगी हे गेल्या 18 वर्षांपासून सोलापुर जिल्हातील विधी क्षेत्रात अत्यंत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. मुंबई उच्च न्यायालय आणि कोल्हापूर खंडपीठ येथे त्यांनी अनेक गरीब पक्षकारांना न्याय मिळवून दिला आहे. विशेषतः फौजदारी (Criminal Side) प्रकरणांत त्यांचे विशेष नैपुण्य असून, गरजू व गरिबांना ते नाममात्र दरात किंवा मोफत कायदेशीर सेवा पुरवतात. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन लायन्स क्लब इंटरनँशनलने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
उपस्थितीचे आवाहन
दिनांक: ४ जानेवारी २०२५ (रविवार)स्थळ: पुलगम पॅलेस फंक्शन हॉल, सोलापूर.या भव्य सोहळ्याला सोलापूरकर नागरिक आणि लायन्स सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रिजन चेअरमन लायन ॲड. श्रीनीवास कटकुर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


