पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना एकत्रित महानगरपालिका निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू होती. बैठका, जागावाटप आणि उमेदवार संदर्भात भाजप आणि शिवसेनेत बैठका देखील पार पडल्या होत्या, मात्र युतीमध्ये अपेक्षित जागा न मिळाल्याने पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेची युती होणार नाही अशी माहिती आहे. शिंदेंची शिवसेना पुण्यात स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढणार आहे. भाजपने फक्त १६ जागा देऊ केल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं शिवसेना नेते नाना भानगिरे यांनी सांगितलं आहे. जागावाटपाच्या निर्णयाबाबत आज पुण्यात शिवसेनेची बैठक पार पडणार होती, या बैठकीसाठी शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत पुण्यात येणार होते, मात्र उदय सामंत पुण्यात येण्याअगोदरच शहराध्यक्ष आणि उपनेत्यांनी पुण्यात कार्यकर्त्यांची बाजू घेतली.
शिवसेनेने 165 जागा लढणार असल्याचं सांगितलं आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला जाणार असल्याचं सांगत युतीत लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. एबी फॉर्म देण्यासाठी शहराध्यक्ष आणि उपनेते हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. पुण्यात शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर झालं आहे. शिवसेना १६५ जागा लढवणार आहे, सर्वांना एबी फॉर्म दिले जातील, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं ?
निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुण्यात भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढणार अशी घोषणा झाली होती, पण दोन्ही पक्षातील नेत्यांच्या चर्चा या इतक्या ताणल्या गेल्या की युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. युतीच्या चर्चांमध्ये सुरुवातीपासूनच भाजप शिंदेंच्या शिवसेनेला १५ जागा देण्याची तयारी दाखवली होती. मात्रा वाटाघाटीनंतरही भाजपने शिवसेनेला १५ जागा सोडण्याची तयारी दर्शवली. १६५ पैकी फक्त १५ जागा लढण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेतील स्थानिक नेते सकारात्मक नसल्याचे चित्र पाहायला मिळालं. तर दुसरीकडे शिवसेना कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी दर्शवली होती. ज्या जागा भाजप किंवा शिवसेना निवडून येऊ शकत नाही त्या जागा भाजप शिवसेनेला देत आहे, असंही शिवसेना नेत्यांनी म्हटलं आहे.
सुरूवातीपासून भाजपकडून शिवसेनेने किमान 25 जागा तरी पक्षाला मिळाव्यात असा आग्रह धरण्यात आला. मात्र जोपर्यंत भाजप सन्मानपूर्वक जागा देत नाही तोपर्यंत युती होणार नाही असं शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर आज युती तुटल्याबाबतची घोषणा पुण्याच्या शहराध्यक्षांकडून करण्यात आली आहे.

