पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) येथे Executive Assistant या महत्त्वाच्या पदावर नुकतीच निवड झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी तालुकाध्यक्ष अनिताताई पवार यांचे चिरंजीव कुणाल राजेंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, व्यापार व उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या वतीने आज आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभानंतर बोलताना, प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी कुणाल पवार यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील उज्ज्वल कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी नागेश दादा फाटे म्हणाले: "कुणाल पवार यांची BMC मध्ये Executive Assistant पदी झालेली निवड ही त्यांच्या कष्टाचे, बुद्धिमत्तेचे आणि प्रामाणिकपणाचे फळ आहे. त्यांनी हे पद मिळवून आपल्या कुटुंबाचे नाव मोठे केले आहे. आम्हाला विश्वास आहे की ते अत्यंत उत्कृष्ट काम करतील.
हा सत्कार समारंभ पवार यांच्या भावी आयुष्यासाठी एक प्रेरणास्रोत ठरणार आहे. याप्रसंगी माजी तालुकाध्यक्ष अनिताताई पवार, विनय शिंदे, निवृत्ती भटकर, सुमित बागल, संग्राम कापसे, हर्षा सुतार , नागेश काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.


