माढा प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रीय स्तरावरील रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन,दापोली या संस्थेचा २०२५ या वर्षाचा महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तांबवे टें ता.माढा येथील निलेश शशिकांत देशमुख यांना प्रदान करण्यात आला.
निलेश शशिकांत देशमुख यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रबोधनाच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन दापोली संस्थेच्या वतीने त्यांची यावर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली होती.
परंतु ते काही कारणास्तव पुणे येथील शिक्षक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नसल्याने रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय खटके, रत्नागिरी जिल्हाध्यक्षा वर्षा खटके यांनी रविवारी कुर्डूवाडी येथील त्यांच्या घरी निलेश देशमुख यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान केला व त्यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी बोलताना निलेश देशमुख यांनी रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन या संस्थेने स्वतःहून माझ्या कार्याची दखल घेऊन हा आदर्श पुरस्कार प्रदान केल्याबद्दल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशिद, राष्ट्रिय उपाध्यक्ष भरत पाटील, राष्ट्रिय कार्याध्यक्ष संजय खटके, राष्ट्रीय सचिव विशाल निकम, जिल्हाध्यक्षा वर्षा खटके तसेच हेमंत कडबाने यांचे आभार मानले.
निलेश देशमुख हे उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक असून शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस व मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष म्हणून शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रबोधनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे आमदार अभिजित पाटील यांनी अभिनंदन केले.


