पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे साहेब यांनी आज पंढरपूर ला भेट दिली. यावेळी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश दादा फाटे यांनी त्यांचे पंढरपूर येथे उत्साहात स्वागत व सत्कार केला.
या भेटीदरम्यान, नागेश दादा फाटे आणि शशिकांत शिंदे साहेब यांच्यात पंढरपूर येथील आगामी निवडणुकीसह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर पडगळ, तसेच सौ. नीता शामराव पडगळ, प्रणव गायकवाड यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री. शिंदे यांच्या दौऱ्यामुळे पंढरपूरमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

