पनवेल प्रतिनिधी तेज न्यूज
आज बुधवार दि. ५ नोव्हेंबर २०२५, हा दिवस आदर्श शैक्षणिक समूहासाठी आणि पदवीधर प्रकोष्ठ,भाजपा,महाराष्ट्र राज्य यांचे साठी अभिमानाचा ठरला.
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सन्माननीय उपस्थितीत, आपल्या महाराष्ट्राचे लाडके, कर्तृत्ववान आणि दूरदर्शी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रुपये २,५१,००० (दोन लाख एकावन्न हजार) इतक्या रकमेचा धनादेश आदर्श शैक्षणिक समूहाच्या आणि पदवीधर प्रकोष्ठ च्या वतीने सप्रेम सुपूर्द करण्यात आला.
यावेळी पदवीधर प्रकोष्ठचे राज्य संयोजक धनराज विसपुते म्हणाले की राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यात एक खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली, हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा व समाधानाचा क्षण ठरला. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आदर्श शैक्षणिक समूह सदैव तत्पर राहील .... हीच आमची वचनबद्धता. असे विसपुते म्हणाले.

