सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
लोककला क्षेत्रात अग्रणीय नाव शाहीर सुभाष गोरे, लोककलेचे जाणकार अभ्यासक म्हणून नावलौकिक असणारे शाहीर सुभाष गोरे यांनी लोककला जतन व संवर्धन करून लोककला सातासमुद्रा पलीकडे पोहोचवली आहे.
याचीच दखल घेऊन महाराष्ट्रातील लोककला क्षेत्रात काम करणाऱ्या 12 दिग्गज लोककलारत्नासोबत यावर्षीचा लोकजागर लोककला पुरस्कार 2025 बुलढाणा येथील हिवरा आश्रम विवेकानंद आश्रम येथे प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे स्वरूप मानाचा शाहिरी फेटा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, प्रबोधनाचा लोकजागर शाहिरी शब्दगुच्छ असे होते.
याप्रसंगी प्रसिद्ध रामायण भागवताचार्य विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष त्यागमूर्ती आर, बी, मालपाणी, उपाध्यक्ष अशोक भाऊ थोरहाते, शिवशंभू चरित्रकार गजानन दादा शास्त्री पवार महाराज, साखरखेर्डा चे ठाणेदार कडेवार साहेब, लोकजागर परिवाराचे अध्यक्ष शाहीर ईश्वर मगर, आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सन्मान शाहीर सुभाष गोरे यांना प्रदान करण्यात आला.

