पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी ता. पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. अनिल निकम, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. समीर कटेकर, पालक प्रतिनिधी श्री. बाबुशा धोत्रे व श्री. कौशलकुमार मिश्रा यांचे हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. अनिल निकम यांनी पालक मेळाव्याच्या आयोजनाचे उद्दिष्ठ स्पष्ट केले. तसेच महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी नमूद केले कि विद्यार्थ्यांनी अपयश मिळाल्यास खचून जाऊ नये. पुढे बोलताना त्यांनी पालकांना आवाहन केले कि त्यांनी आपला पाल्य महाविद्यालयामध्ये असताना काय करत असतो हे त्यांनी महाविद्यालयामध्ये भेट देऊन पाहावे.
यावेळी पालकांना मार्गदर्शन करताना उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार घेण्यात येणाऱ्या उपक्रमातून या होणार फायदा स्पष्ट केला व महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या वेगवेगळ्या मंचांचा वापर करून विद्यार्थी कसे संशोधनास आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडू शकतील यावर प्रकाशझोत टाकला. महाविद्यालयाचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. समीर कटेकर यांनी विद्यार्थ्यांना कॉलेजकडून उपलब्ध दिल्या जाणाऱ्या नोकरीच्या संधींबद्दल माहिती दिली.
आपले मनोगत व्यक्त करताना पालक प्रतिनिधी श्री. कौशलकुमार मिश्रा म्हणाले कि परिश्रमाशिवाय आपल्याला आयुष्यात यश संपादन करता येत नाही. कुटुंब, समाज, व देशासाठी सर्वानी कठीण परिश्रम करणे गरजेचे आहे. आपल्याकडे खरे ज्ञानवर्धित विद्यार्थी हे कठीण परिस्थितीतून पुढे आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आपल्या मनोगताचा शेवट त्यांनी सर्वांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा देऊन केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सर्वांना सध्याच्या कठीण अशा स्पर्धात्मक परिस्थितीच जाणीव करून दिली व विद्यार्थ्यांना ध्येय वेडे होऊन आपल्या भविष्याकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले कि विद्यार्थ्यांनी योग्यरित्या ध्येय सध्या करण्याचे नियोजन केल्यास त्यांना अपेक्षित यश नक्कीच मिळते परंतु जर ते नियोजन करण्यात चुकले तर अपयश मिळते. आपण योग्य नियोजन करायला फसलो तर आपण फसण्याचे नियोजन करून बसतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, व कठीण परिश्रम करून यश संपादन करावे असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी प्रथम वर्षातील श्रेयश शिंदे, गार्गी गंधारे, संकेत जाधव, समृद्धी यादव व वासंती पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी पवार यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन डॉ. दिपक गानमोटे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.

