भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
आज बुधवार दिनांक २६/११/२०२५ रोजी वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर, भाळवणी येथे भारताचा संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रथम २६ /११ च्या मुंबई येथे दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सर्व भारतीय नागरिक व शहिद पोलिस अधिकारी यांना प्रशालेच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहुन अभिवादन करण्यात आले.
यानंतर संविधान दिन निमित्त भारतरत्न व संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एल.काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी संविधान दिनानिमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपली भाषणे थोडक्यात सादर केली तसेच इयत्ता चौथीतील सर्व विद्यार्थ्यांनी संविधानमुळे आपल्याला कोणते फायदे मिळतात यावर छोटेसे पथनाट्य सादर केले.
संविधान दिनानिमित्त प्रशालेतील सहशिक्षक ए.डी.जाधव तसेच मुख्याध्यापक एस.एल.काळे यांनी आपल्या भाषणात संविधानाचे महत्व,संविधानाचे फायदे,संविधानाचे आपल्या जीवनात असणारे महत्व व संविधानामुळे आपल्याला मिळालेले अधिकार याविषयी थोडक्यात माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्याना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आजच्या संविधान दिनाच्या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व सहशिक्षक,सहशिक्षिका तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशालेतील सहशिक्षक आय.एन.शेख यांनी केले.

