जळोली शाळेने समूहगीत स्पर्धेत यशाची परंपरा कायम राखली
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषद सोलापूर यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.त्यामध्ये समूहगीत गायन स्पर्धेमध्ये जि.प.प्राथ.शाळा जळोली शाळेने मोठ्या गटात तालुक्यास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक तर लहान गटात द्वितीय क्रमांक पटकाविला आणि मोठ्या गटाची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.प्रत्येक वर्षी यशाची परंपरा कायम राखत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मार्गदर्शक शिक्षकांनी केलेल्या कष्टाचे चीज झाल्यामुळे जळोली शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि पालकांनी कौतुक करत अभिनंदन केले.
यासाठी मुख्याध्यापक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे आणि देवकी कलढोणे -दुधाणे आणि सतीश कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेत सहशिक्षक जयवंत कापसे नागनाथ गायकवाड , सिध्देश्वर लोंढे , कैलास नरसाळे , बाळू खांडेकर , यांच अधिक सहकार्य लाभले.पुढील काळातही विविध प्रकारच्या स्पर्धेतही अधिकाधिक यश मिळवण्यासाठी सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत.
या यशाने गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे केंद्रप्रमुख पा.वा.जाधव.पदाधिकारी नुतन अध्यक्ष हनुमंत नरसाळे उपाध्यक्ष साधना किर्ते, सरपंच ज्योतीराम मदने.समाधान काका नरसाळे,मनोज नरसाळे.गणेश जाधव .बलभिम नरसाळे, बाळासाहेब नरसाळे, महेश नरसाळे आणि पालकांनी यांनी कौतुक करत अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.


