सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरीय मॉर्डन पेंटाथलॉन स्पर्धेमध्ये अभूतपूर्व कामगिरी करत यश संपादन केले आहे.
क्रीडा विभागातर्फे आयोजित विविध वयोगटातील शालेय मॉर्डन पेंटाथलॉन स्पर्धांमध्ये १७ वर्षाखालील मुलींच्या गटात संस्कृती प्रमोद कटारिया हिने प्रथम क्रमांक पटकवला आहे व १७ वर्षाखालील मुलांच्या गटात ओम पाटील याने चतुर्थ क्रमांक पटकवला. या दोघांची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी पल्लवी पाटील, कविता कटारिया व साहिल राणा या क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. तसेच विविध प्रकारच्या कौशल्यात्मक खेळातून विजय कसा संपादन करायचा, सातत्य कसं राखायचं याविषयी प्राचार्य शिवाजी गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

