महात्मा बसवेश्वर समता ,मन्मथ माऊली यांचे अध्यात्मिक करू,राष्ट्रसंत सिद्ध शिवाचार्य महास्वामी यांचे राष्ट्र उभारणी कार्यातून लोकांनी प्रेरणा घ्यावेत.सहकारमंत्री ना बाळासाहेब पाटील यांचे आवाहन
सामाजिक कार्याचा गौरव शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ठ सेवाधारी संस्था पुरस्कार व विविध क्षेत्रातील मान्यवरांचे पुरस्कार सोहळा
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्रीक्षेत्र कपिलधार येथे बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी सायं 6 वाजता महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना बाळासाहेब पाटील, डॉ अर्चना पाटील चाकुरकर व शिवा संघटना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे व विविध मान्यवरांच्या शुभहस्ते थाटात वितरण करण्यात आले
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पौर्णिमेच्या निम्मित श्री क्षेत्र कपिलधार तालुका जिल्हा बीड येथे मन्मथ माऊली शासकीय महापूजा व भव्य राष्ट्रीय वार्षिक मेळावा व शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी सायं 5 ते 8 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला या 30 वे वार्षिक मेळावा साठी राज्यभरातून विविध मान्यवर उपस्थित होते,माजी आमदार खंदरे ,विविध मठाचे मठाधिपती,शिवाचार्य स्वामीजी व मल्लिकार्जुन नावंदे,शिवा संघटना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
या मेळाव्यात विविध क्षेत्रातील वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवरांचा शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान मनावरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,श्रीफळ ,शाल देऊन मानाचा सन्मान देशातील वीरशैव लिंगायत समाजातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवा संघटनेच्या या राष्ट्रीय पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरां व शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शन खाली हे पुरस्कार सोलापूर येथील ड्रीम फाउंडेशन या संस्थेला शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ठ सेवाधारी संस्था पुरस्कार संस्थापक अध्यक्ष श्री काशीनाथ गुरशांत भतगुणकी यांना हा पुरस्कार देण्यात आले. ड्रीम फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष काशीनाथ भतगुणकी सचिवा संगीता पाटील,मार्गदर्शक गजराबाई गुरूषंत , सुरेश वाघमोडे, गीता वाघमोडे,बसवराज भतगुणकी यांच्या सह ड्रीम फाउंडेशन पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ड्रीम फाउंडेशन मागील 20 वर्ष पासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षा व करियर मार्गदर्शन,युवा कौशल्य विकास,महिलांना भाकरी उद्योग,पर्यावरण जागर उपक्रम,जल साक्षरता संमेलन,सेंद्रिय शेती मार्गदर्शन,विविध विषयावर प्रबोधन व्याख्यान व युवा जागृती उपक्रम राबविले जाते संस्थापक अध्यक्ष श्री काशीनाथ भतगुणकी यांनी सोलापूर ते दिल्ली सायकल प्रवास करून युवा जागृती केले असून ग्रामीण भागातील युवकांना ते महात्मा बसवेश्वर यांचे समतेचे विचार व विविध महापुरू यांचे प्रेरणादायी विचार लोकांना व्याख्यान द्वारे देत आहेत हे कार्य कौतुकास्पद असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले
शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार सोहळ्यास राष्ट्रीय उपाध्यक्ष अभ्यराव कल्लावर राष्ट्रीय सचिव उमाकांत अप्पा शेटे ,यांनी सांगितले, शिवानंद सारणे मामा,श्री अरविंद भाडोळे पाटील,जिल्हा अध्यक्ष शरणरराज केंगनाळकर, महांतेश पाटील यांच्या सह विविध जिल्ल्यातील शिवा मावळे उपस्थित होते.


