श्रीक्षेत्र कपिलधार येथे दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी मान्यवरांच्या हस्ते केले जाणार वितरण
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुध्द पौर्णिमेच्या निम्मित श्री क्षेत्र कपिलधार तालुका जिल्हा बीड येथे होणाऱ्या मन्मथ माऊली शासकीय महापूजा व भव्य राष्ट्रीय वार्षिक मेळावा दर वर्षी आयोजित केले जाते,बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी दु 4 वाजता 30 वे राष्ट्रीय वार्षिक मेळावा व राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील वीरशैव लिंगायत समाजातील मान्यवरांचा शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे .
ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांचा यथोचित सन्मान मनावरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,श्रीफळ ,शाल देऊन मानाचा सन्मान देशातील वीरशैव लिंगायत समाजातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा शिवा संघटनेच्या या राष्ट्रीय पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांची शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांनी हे पुरस्कार नुकतेच जाहीर केले असून देशातील 15 क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान होणार असून सोलापूर येथील ड्रीम फाउंडेशन या संस्थेला शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ठ सेवाधारी संस्था पुरस्कार संस्थापक अध्यक्ष काशीनाथ गुरशांत भतगुणकी यांना हा पुरस्कार जाहीर झाले आहे.
ड्रीम फाउंडेशन मागील 20 वर्ष झाले विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षा व करियर मार्गदर्शन,युवा कौशल्य विकास,महिलांना भाकरी उद्योग,पर्यावरण जागर उपक्रम,जल साक्षरता संमेलन,सेंद्रिय शेती मार्गदर्शन,विविध विषयावर प्रबोधन व्याख्यान व युवा जागृती उपक्रम राबविले जाते संस्थापक अध्यक्ष श्री काशीनाथ भतगुणकी यांनी सोलापूर ते दिल्ली सायकल प्रवास करून युवा जागृती केले असून ग्रामीण भागातील युवकांना ते महात्मा बसवेश्वर यांचे समतेचे विचार व विविध महापुरू यांचे प्रेरणादायी विचार लोकांना व्याख्यान द्वारे देत आहेत,
शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री जयकुमार गोरे, पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे, अतुल सावे,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सह बीड जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते होणार असल्याचे शिवा संघटना राष्ट्रीय उपाध्यक्ष अभ्यराव कल्लावर राष्ट्रीय सचिव उमाकांत अप्पा शेटे यांनी सांगितले.
ड्रीम फाउंडेशन संस्थेस शिवा राष्ट्रीय भूषण उत्कृष्ट सेवाधारी संस्था पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिवानंद सारणे मामा, अरविंद भाडोळे पाटील,शरणरराज केंगनाळकर, महांतेश पाटील,राजू कुलकर्णी सर,संभण्णा हलोळी सर,किरण पुजारी,मुख्याध्यापक सचिन बिराजदार सर,गौरीशंकर बिराजदार, संगमेश्वर देवस्थान चे संगप्पा केरके,मधुकर बिराजदार,अशोक सोनकांटले, राहुल ताटे, तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे,हत्तरसंगचे सरपंच,आदिशक्ती महिला मंडळ,विविध संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.


