भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी येथील रस्त्यावरील गटारीची पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी रस्त्यावर झाले होते. त्यामुळे त्या रस्त्यावरून येणाऱ्या नागरिकांना शाळेतील विद्यार्थ्यांना व महिलांना त्रास होत होता.
याबाबत परिसरातील नागरिकांनी व तेज न्यूज परिवाराच्या वतीने सरपंच रणजीत जाधव यांना रस्त्याच्या दुरुस्ती विषयी विनंती केली होती. या विनंतीची दखल घेऊन सरपंच रणजीत जाधव यांनी पाईपलाईन दुरुस्ती करून देऊन तात्काळ विद्यार्थ्यांचा येण्या जाण्याचा मार्ग खुला करून दिला.
त्याबद्दल परिसरातील नागरिकाकडून व विद्यार्थ्याकडून सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी डी एस वाघमारे यांचे मनापासून समाधान व्यक्त केले जात आहे.