भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पुढील महिन्यांत होणाऱ्या जिल्हा परिषद भाळवणी ( राखीव) गटातून अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. असे मत मोहन इंद्रजित भोसले यांनी तेज न्यूजला सांगितले आहे.
यावेळी भोसले म्हणाले की,ही निवडणूक लढवत असताना मी सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरूनच मार्गक्रमण करणारं आहे. कोणत्याच एका व्यक्तीला उघडपणे माझ्यासोबत फिरावं किंवा प्रचार करावा म्हणून आग्रह किंवा त्रास देणारं नाही. आज पर्यंत मी वेगवेगळ्या विषयासंबंधी वेगवेगळी आंदोलनं करत पीडित व्यक्तींना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला आहे. या अगोदर मी कधीच चुकीच्या गोष्टीला समर्थन किंवा पाठबळ दिलं नाही.
एखादा लढा लढत असताना मी माझ्या भूमिकेवर ठाम राहून लढत राहिलो यासाठी काय किंमत मोजावी लागली ती सहन करून अन्यायाविरोधात लढा देत राहिलो. आज पर्यंत मी स्वतः च्या स्वार्था साठी कोणास वेठीस धरले नाही. मी माझ्या आयुष्यात कधीच कोणाला स्वतः चा विरोधक समजलं नाही, समजणार हि नाही... संविधानाने प्रत्येकाला अधिकारी दिले आहेत. त्यामुळं सर्वांना काय निर्णय घ्यायचा याचे स्वातंत्र्य दिले आहे.... आपली साथ सदैव माझ्या पाठीशी असू द्या. असे ही मोहन भोसले यांनी आव्हान केले आहे