पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेम मध्ये नवीन आलेल्या शिक्षकांचा स्वागत समारंभ व बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमा प्रसंगी सर्व शिक्षकांचा सन्मान सरपंच महादेव गाढवे माजी सरपंच सुरेखा रघुनाथ गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौठाळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन ईश्वरा धुमाळ होते
या कार्यक्रमाच्या वेळी सई शिंदे, संध्या काळे, राजाभाऊ पवार, सचिन बाजारे, दशरथ नागटिळक यांनी मनोगत व्यक्त केले. आरोग्य सेविका पी.व्ही. पांढरे यांना सेवेची एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास मार्केट कमिटीचे संचालक अरुण नागटिळक, मार्केट कमिटीचे माजी संचालक रघुनाथ गोडसे, सोसायटीचे माजी चेअरमन दिलीप इंगळे, आप्पासाहेब आटकळे यांच्या सह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास नागटिळक यांनी केले.

