पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा सांगोला येथील विद्यामंदिर विद्यालयात संपन्न झाल्या. या स्पर्धेत वाखरी, पंढरपूर येथील एमआयटी ज्युनियर कॉलेजच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली.
स्पर्धेमध्ये १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला, तर १९ वर्षांखालील मुलींच्या संघानेही तृतीय क्रमांक मिळवत महत्त्वपूर्ण यश संपादन केले. विशेष म्हणजे या स्पर्धेतून श्रवण इंगळे, सुजल अग्रवाल आणि दिव्या लोकरे या विद्यार्थ्यांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेमध्ये ते जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्याध्यापिका शिबानी बॅनर्जी आणि प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ यांनी संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

