भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे दीपावली व भाऊबीज निमित्त आज रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता शाकंभरी देवी मंदिराच्या पटांगणावर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर निकिता बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी भाळवणी व भाळवणी पंचक्रोशीतील सर्व महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी .अशी विनंती तीसऱ्या आघाडीचे युवा नेते विजय शिंदे यांनी केली आहे.

