तासगांव जि. सांगली प्रतिनिधी तेज न्यूज
संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनासाठी तासगाव कवठेमंकाळ (जिल्हा सांगली) मतदारसंघाचे आमदार रोहित (दादा) पाटील यांना आज औपचारिकरित्या निमंत्रण देण्यात आले.
या भेटीदरम्यान आ. लरोहित पाटील यांनी महासंमेलनाबद्दल उत्साह व्यक्त करत सांगितले की, “संत नामदेव महाराजांच्या विचारांवर आधारित हा ऐतिहासिक सोहळा समाजाला एकतेचा नवा संदेश देईल.मी स्वतः या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे.तासगांव येथून नागपूरपर्यंत समाजबांधवांसोबत योग्य ते नियोजन करून मोठ्या प्रमाणावर सहभाग निश्चित करू.” असे आश्वासन त्यांनी दिले.
या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष मिनलताई कुडाळकर,सांगली जिल्हा उपाध्यक्ष संतोष वेल्हाळ, जिल्हा जनसंपर्क प्रमुख युवराज कोळेकर तसेच समाजातील अनेक मान्यवर उपस्थितीत महा संमेलना बद्दल चर्चा झाली.
महासंमेलनाचे आमंत्रण स्वीकारताना आ.पाटील यांनी संत नामदेव महाराजांच्या कार्य व अभंग परंपरेचा गौरवपूर्वक उल्लेख करत समाज ऐक्य आणि राष्ट्रचिंतनाच्या दिशेने हे अधिवेशन मोलाचे ठरेल,असा विश्वास व्यक्त केला.

