पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी प्रचारासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या नादब्रह्म कला फाऊंडेशन करकंब आणि आरती साऊंड सिस्टीम मनमाडकर परिवार यांचे वतीने शास्त्रीय संगीताची मैफल बुधवार दिनांक ५ नोव्हेंबर (गुरुनानक जयंती सुट्टी दिवशी) सायंकाळी ६:०० वाजता आरती मंडप प्रांगण भक्तीमार्ग श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली.
यामध्ये प्रथम सत्रात पद्मश्री डॉ अश्विनीताई भिडे-देशपांडे यांच्या शिष्या डॉ रेवती भरत कामत तर द्वितीय सत्रामध्ये पद्मविभूषण डॉ प्रभा अत्रे यांच्या शिष्या आणि किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका आरती ठाकूर -कुंडलकर यांच गायन आयोजित करण्यात आले आहे
त्यांना हार्मोनियम साथ सुयोग कुंडलकर तबला संजय देशपांडे पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे यांची सुंदर साथसंगत लाभणार आहे.ध्वनीव्यवस्था आरती साऊंड धनंजय भैय्या मनमाडकर यांची असणार आहे.तसेच नादब्रह्म कला फाऊंडेशन आणि आरती साऊंड मनमाडकर परिवार यांचे वतीने वर्षभर अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार त्यामध्ये अभिषेकी संगीत महोत्सव आणि त्रैमासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात येत आहे .
अभिजात शास्त्रीय संगीतावर प्रेम करणाऱ्या कलासाधक आणि कलारसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक भगवान भाऊ मनमाडकर आणि ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कला रसिक साधक अधिक परिश्रम घेत आहेत.


