पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप पदवीधर प्रकोष्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील स्पर्धकांची नावे असलेले पुस्तक पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांना पुस्तक भेट दिले .यावेळी माढा लोकसभा पदवीधर प्रकोष्ठचे संयोजक प्रशांत माळवदे, मेडिकल कॉलेज चे संदीप जाधव उपस्थित होते.
यावेळी डॉ.बी पी रोंगे म्हणाले की राज्यात पदवीधर प्रकोष्ठचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पदवीधर, शिक्षक यांची मतदार म्हणून नोंद करणे सुरू झाले आहे.तरी सर्वांनी नोंद करावी अशी विनंती रोंगे यांनी यावेळी केली.

