दि बा पाटील यांचे नाव देण्यास उशीर नको
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी ग्रामस्थ पूर्वीपासूनच आग्रही आहेत.राज्याने देखील केंद्र सरकार आणि संबंधित विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे.तरीही नाव न देताच आता उद्घाटनाचा घाट घातला जात आहे. दि बा यांचे नाव देण्यास उशीर का होतोय याचे उत्तर केंद्र आणि राज्य सरकारकडे नाही.डिसेंबर जानेवारीत स्थानिक स्वराज्य, महानगरपालिका निवडणुका आहेत.नवी मुंबईत विमानतळासारखे मोठे काम आम्ही केले असे सत्ताधाऱ्यांना जनतेला दाखवायचे असून मत मागायची आहेत. इतरवेळी कोणत्याही वास्तूचे नाव बदलायचे तर केंद्र आणि राज्य खूप अधीर असतात.पण नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे देण्याच्या प्रस्तावा व्यतिरीक्त इतर कोणत्याही नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आलेला नाही.असे असताना विमानतळाला नाव न देता ते सुरू करणे कितपण योग्य आहे? असा सवाल नवी मुंबईकर विचारात आहेत.तेव्हा केंद्रानेही वेळ काढूपणा न काढता लागलीच दि बा पाटील यांचे नावावर शिक्कामोर्तब करायला हवे आणि त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करायला हवा.
गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व

