भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील माळावरील श्री भवानी देवीची यात्रा सोमवार दिनांक 6 /10/2025 ते मंगळवार दिनांक 7/10/2025 या दोन दिवशी भरवली जाणार असल्याची माहिती सरपंच रणजीत जाधव यांनी दिली.
यावेळी रणजीत जाधव म्हणाले की सोमवार दिनांक 6 /10 /2025 रोजी पहाटे पाच वाजता श्री ची महापूजा व अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता श्री चा छबिना मिरवणूक निघणार आहे.
मंगळवार दिनांक 7 /10/2025 रोजी पहाटे पाच वाजता श्री ची महापूजा व अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून धनगरी ओव्या लेझीम स्पर्धा, गजी ढोल स्पर्धा घेण्यात येतील व संध्याकाळी 5 वाजता बक्षीस वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
तसेच या वर्षी व्यापारी , पाळणेवाले, हॉटेल ,चहा, व किरकोळ व्यापाऱ्यांना जागेसाठी योग्य तो भाव आकारला जाईल. असे ही जाधव यांनी तेज न्यूजला सांगितले.
तरी भाळवणी परिसरातील व्यापाऱ्यांनी भाविक भक्तांनी या यात्रेत सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवावी अशी विनंती सरपंच रणजीत जाधव यांनी केली आहे.अधिक माहिती करिता संपर्क 9975815599 / 9922309859 / 9890314394 साधावा.


