पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील शेलवे (Shelve) गावाच्या एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या मतीन अमिन शेख या होतकरू तरुणाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत २०१० साली इंजिनिअरिंगची पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी केवळ स्वतःचे कुटुंब शिक्षित केले नाही, तर प्रोफेसरशिप करत असतानाच त्यांनी स्टार अकॅडमी, पंढरपूर (STAR ACADEMY PANDHARPUR) नावाचे शैक्षणिक रोपटे लावले. आज त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल, समर्पण वृत्तीबद्दल आणि विद्यार्थ्यांसाठी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल यांना राज्यस्तरीय डॉ. कलाम राष्ट्र उभारणी पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले.
सोलापूर येथील व्ही व्ही पी कॉलेज येथे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम याच्या 94 व्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशन, डॉ. कलाम मिशन, कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र राज्य व अन अकॅडमी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सीसीए चे राज्य अध्यक्ष प्रा. डॉ. पी एम वाघ यांच्या हस्ते प्रा. मतीन अमीन शेख यांना शाल,प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी , आत्मीय एज्युकेशन पुणे रिजनल हेड डॉ. नीरजकुमार शहा, सीसीए राज्य सरचिटणीस ज्ञानेश्वर ढाकणे, व्हीव्हीपी कॉलेज सोलापूरचे अध्यक्ष प्रा.डॉ. जी के देशमुख,प्राचार्य कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते. स्टार अकॅडमी पंढरपूर (STAR ACADEMY PANDHARPUR) स्थापना 2014 मध्ये झाली असून 1ली ते 10वी पर्यंत CBSE ENGLISH MEDIUM SEMI MEDIUM चे विद्यार्थी आजपर्यंत हजारो संख्येने शिकून गेले असून ते आज इंजिनियरिंग आणि मेडिकल फार्मसी सारखे उच्च शिक्षण घेत आहेत.त्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन उपस्थित मान्यवरांनी केले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल रामदास नागटिळक, राहुल ताटे सर, पत्रकार प्रशांत माळवदे, त्यांचे बंधू प्रा. अजिज अमीन शेख, प्रा.प्रमोद क्षीरसागर , प्रा.अजिंक्य गुरव , प्रा. कौस्तुभ सांगोलकर , प्रा. सरवदे , , प्रा.वाघमारे मॅडम, प्रा. तरंगे मॅडम, प्रा. शिंदे मॅडम, प्रा. खंडागळे मॅडम सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अभिनंदन केले.