उदय वाघवणकर मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
कुपर रुग्णालयात डिसेंबर-जानेवारी २०२६ महिन्यात सीएसआरच्या माध्यमातून केमो सुविधा सुरू, ट्रॉमा रुग्णालयात दोन शिफ्टमध्ये डायलिसिसची सुविधा, ट्रॉमा रुग्णालयात डॉ. प्रवीण बांगर यांची नियुक्ती, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालय आणि कूपर रुग्णालयातील अनागोंदी कार्यपद्धतीबाबत वाढत्या तक्रारीची गंभीर दाखल घेत खासदार रविंद्र वायकर यांनी कूपर रुग्णालयात घेतलेल्या बैठकीत सिद्धार्थ व ओशिवरा रुग्णालय लवकरात लवकर सुरू करावे. ट्रॉमा येथे कॅथलॅब सुरू करण्यात यावी. अशा सूचना सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या.या बैठकीला मनपाचे अतिरिक्त मनपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा उपस्थित होते.
येथील रुग्णसेवा आणि दैनंदिन कामकाजाचाही खासदार यांनी आढावा या बैठकीला उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. (श्रीमती) नीलम अंद्राडे, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, सहाय्यक आयुक्त अल्ले, माजी नगरसेवक व विभाग प्रमुख राजू पेडणेकर, अल्ताफ पेवेकर, स्वप्नील टेंबवलकर, संजय पवार, विष्णू सावंत, कमलेश राय, आत्माराम चाचे, राजुल पटेल, प्रतिमा खोपडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कुपर रुग्णालयात डिसेंबर-जानेवारी महिन्यात सीएसआरच्या माध्यमातून केमो सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अतिरिक्त मनपा आयुक्त वर्मा यांनी दिली.
ट्रॉमा रुग्णालयात दोन शिफ्टमध्ये डायलिसिसचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती शर्मा यांनी दिली.तर या रुग्णालयात केईएम रुग्णालयाचे उपअधिष्ठात डॉ. प्रवीण बांगर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.कंत्राटी भरती मध्ये झालेला घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी खासदार रविंद्र वायकर यांनी केली. वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीला एकाच ठिकाणी कामावर कसे ठेवू शकतात, असा प्रश्न खासदार वायकर यांनी उपस्थित केला. रुग्णालयात कंत्राटाची मुदत संपत असेल त्याच्या तीन महिने अगोदरपासून टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी सुचना खासदार वायकर यांनी केली. डॉक्टर यांना ऑपरेशनचे टारगेट देण्यात यावे, ऑपरेशन लवकरात लवकर करावे, आदी सूचना खासदार यांनी केल्या.
या बैठकीदरम्यान रुग्णालय प्रशासनामार्फत सांगण्यात आले की, डॉक्टरांची भरती प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. त्यासोबतच एनआयसीयू आणि आयसीयू रुग्णशय्यांची संख्या वाढवण्यासाठी रुग्णालय प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच केमोथेरेपी सुविधाही येत्या कालावधीत सुरू करण्यात येणार आहे.रुग्णांसाठी औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. रुग्णालय परिसरात अधिकाधिक स्वच्छता ठेवण्यासाठी तसेच उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनामार्फत देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद चांगल्या पद्धतीने घडावा यासाठी कर्मचारी वर्गाला संभाषण कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
येत्या दिवसांमध्ये डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांनाही संभाषण कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.रुग्णसेवा अधिकाधिक सुरळीत करण्याच्या अनुषंगाने आणि रुग्णांसाठी सुलभ यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध आहे. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन रुग्णसेवा अधिकाधिक चांगल्या करण्याच्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांना पाठबळ द्यावे, असे आवाहन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी याप्रसंगी केले.

