दिघी प्रतिनिधी तेज न्यूज
बोपखेल भागातील विविध विकास कामासाठी ताईंनशी चर्चा करण्यात आली .काही भेटी या फक्त औपचारिक नसतात, त्या मनाला उर्जा देतात, विचारांना दिशा देतात आणि पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास निर्माण करतात.
आजची भेट तशीच होती भविष्यातील भूमिका आणि जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या, यासाठी योग्य दिशा आणि नैतिक आधार मिळवण्यासाठी अशा भेटींची गरज असते.सुषमा ताई फक्त नेत्या नाहीत, त्या माझ्यासाठी योग्य मार्गदर्शका आहेत.
त्यांच्या शब्दांमधील ताकद, त्यांच्या विचारांमधील स्पष्टता आणि त्यांच्या उपस्थितीतील मायेची ऊब ही माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
ही भेट माझ्यासाठी पुढील प्रवासासाठी आधारस्तंभ ठरली आहे.त्यावेळी गोपी घुले प्रशांत नाईक संतोश गायकवाड उपस्थित होते

