पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील पिकाचे पंचनामे करत असताना तलाठी आणि कृषी सहाय्यक शेतकऱ्याच्या पंचनाम्याला वेगवेगळे नियम अटी सांगून अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे .आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .
मागण्या :- 1) पंढरपूर तालुक्यात महापूर व अतिवृष्टी यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे कोणतेही नियम अटी न लावता सरसकट पंचनामे करावे
2) शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून होणारी 15 रु. कपातीचा निर्णय स्थगित करावा
3) ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी जाहीर करावी
या सह विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक या सर्वांना इशारा दिला आहे शेतकऱ्यांच्या पिकाची पंचनामे करत असताना तुम्ही वेगवेगळे नियम अटी लावत आहात राज्याचे मुख्यमंत्री वारंवार मीडियाच्या माध्यमातून सरसकट पंचनामे करण्यासाठी सूचना देत असताना तलाठी आणि कृषी सहाय्यक मात्र शेतकऱ्याची आडवणूक करत आहेत जर तुम्ही आम्हाला आता नियम अटी दाखवल्या तर परत गाव पातळीवर काम करत असताना तुम्हाला सुद्धा शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमाची पाळाव्या लागतील गावागावातील तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय व कृषी सहाय्यक हे रोजच्या रोज कामावर येतात का शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांना मिळवून देतात का आणि कोणत्याही प्रकारचे लाच न घेता सर्व काम करून देतात का यासाठी शेतकऱ्यांची पोर आम्ही प्रत्येक कार्यालयासमोर बसवून तुम्हालाही इथून पुढे शासनाच्या नियमातच वागायला शिकवणार आहे याची नोंद घ्यावी
त्याचबरोबर शेतकऱ्याच्या ऊस बिलातून नुकसान भरपाईसाठी पैसे कपात करणे हे शेतकऱ्याचा संताप भडकवण्याचं काम सरकार करत आहे ज्या शेतकऱ्याचा ऊस अतिवृष्टी आणि महापुरामुळे खराब झाला आहे त्याला नेहमीपेक्षा कमी आवरेज मिळणार आहे त्याचा चाळीस-पन्नास टक्के तोटा होणार आहे आणि अशा माणसांवरच कपातीची टांगती तलवार लावून 100 टन ऊस घालवणाऱ्या शेतकऱ्याला जवळपास सर्व टॅक्सेस पकडले तर 3000 रुपये म्हणजे एक टनाचे पैसे सरकारला द्यावे लागणार आहेत याआधी साखर कारखानदार काटा हाणत होते आता सरकारला 100 टनाला एक टनाचा काटा आणायला सुरुवात केली असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही त्यामुळे सरकारने राज्यातील वेगवेगळे प्रकल्प उभा करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना कर्ज वेगवेगळ्या आयडिया वापरून फंड उभा केले परंतु शेतकऱ्यांना द्यायचं म्हणलं की आमचाच खिसा कापून आम्हाला देण्याची आयडिया काढली शेतकरी अतिवृष्टी व महापुरामुळे प्रचंड अडचणीत आला आहे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये मदत आणि कर्जमाफी करावी अन्यथा या संकटामुळे शेतकरी कोलमडून पडेल आणि राज्यातील शेती व्यवस्था उध्वस्त होईल याची नोंद घ्यावी जर सरकारने या मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार नाही केला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरेल आज राजू शेट्टी साहेब सोलापूर जिल्ह्यातील तसेच धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत आहेत हा दौरा पूर्ण होताच जर शेतकऱ्यांना शासनाने समाधानकारक मदत नाही केली तर राज्यभर आम्ही या सरकार विरोधात रस्त्यावर उतरून या सरकारला सोळंकी पळो करून सोडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
यावेळी शेतकरी संघटनेचे तानाजी बागल शहाजहान शेख,नितीन बागल प्रताप गायकवाड नामदेव कोरके नानासाहेब चव्हाण नामदेव पवार अमर इंगळे सोमनाथ घोगरे अतुल गायकवाड नवनाथ मोहिते इत्यादी सह सर्व पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनो खबरदार
शेतकऱ्यांचे पंचनामे करताना तुम्ही आम्हाला त्रास दिला तर लक्षात ठेवा पुन्हा गाठ आमच्याशी आहे गाव गाड्यातील तुमचा सगळा सावळा गोंधळ आम्ही बाहेर काढून एक एकाला अँटी करप्शन ला दिल्या शिवाय सोडणार नाही
सचिन पाटील ,स्वाभिमानी शेतकरी संघटना

