भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी तालुका पंढरपूर प्रशालेच्या शिवतेज अंकुश गायकवाड विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्यांचा सन्मान आणि सत्कार विद्यालयाचे प्राचार्य के डी शिंदे यांच्या हस्ते पार पडला. जिल्हास्तर प्रथम क्रमांकाने स्पर्धा जिंकून पुढे कुच केले आहे.या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना धाडसाने व डाव प्रति डाव करून आपल्या खेळाशी प्रामाणिक राहून राज्यस्तरापर्यंत मजल मारावी अशा शुभेच्छा प्राचार्य के.डी.शिंदे यांनी व्यक्त केल्या.
या मुलांना प्रचाराच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजीराजे शिंदे, वामनभाऊ सराटे पाटील , भगवानराव चौगुले, सरपंच रणजीत जाधव,उपप्राचार्या श्रीम. मोरे ,पर्यवेक्षक बेसिकराव , ज्येष्ठ शिक्षक झांबरे , संजय शिंदे , कडव सर प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी,क्रीडाशिक्षक गजानन जमदाडे, कैलास कोकणी यांनी शुभेच्छा दिल्या

