इंदापूर प्रतिनिधी तेज न्यूज
इंदापूर बस स्थानकावर मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक उभ्या राहिलेल्या एसटीला आग लागली आणि काही समजायच्या आत या आगीत संपूर्ण एसटी जळून खाक झाली.
एसटीमध्ये जवळपास 50 प्रवासी होते सुदैवानं कोणालाही इजा झाली नसली तर या प्रवाशांचं साहित्य मात्र जळून राख झालं आहे.धाराशिव पुणे बस मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास इंदापूर बस स्थानकाच्या फलाट क्रमांक 11 वर आली.ज्यावेळी आग लागली त्यावेळी बसमध्ये जवळपास 50 प्रवासी होते.
त्यामुळे अचानक एकच गोंधळ उडाला प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला.तात्काळ अग्निशामक बोलावून ही आग आटोक्यात आणली मात्र या आगीत बसचा पूर्ण नुकसान झालंय.

