पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव चा सुमित माने व कार्तिक साळुंखे तालुकास्तरीय रनिंग स्पर्धेमध्ये पंधराशे मीटर व 300 मीटर मध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड नुकत्याच पंढरपूर येथे तालुकास्तरीय स्पर्धा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये तालुक्यातून सर्व गटातील विद्यार्थी स्पर्धेसाठी उपस्थित होते.
यामध्ये पंधराशे मीटर धावणे 17 वर्षे वयोगट व 3000 मीटर धावणे 17, यामध्ये कार्तिक साळुंखे यांनी प्रथम क्रमांक मिळाला त्याचबरोबर पंधराशे मीटर धावणे 19 वर्षे वयोगट व 3000 मीटर धावणे 19 वर्षे वयोगट यामध्ये सुमित माने यांनी प्रथम क्रमांक मिळवला या यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी अभिनंदन केले त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहेत त्या पुढील महिन्यामध्ये होणार आहेत. उत्तर झालेल्या डॉजबॉल स्पर्धेमध्ये शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे विविध क्रीडा क्षेत्रांमध्ये शिवरत्न पब्लिक स्कूल मधील विद्यार्थी नेहमीच चमकताना दिसत आहेत सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या

