भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला तालुक्यातील महिम येथे ओढ्यात वाहून गेल्याने श्रीधर किरण ऐवळे, सोमनाथ विठ्ठल ऐवळे या दोघांचा दुर्देवी अंत झाला. या घटनेमुळे ऐवळे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. असे मत भाजप जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले.
या दोन्ही कुटुंबास आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमारजी गोरे व भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या कडून ऐवळे कुटुंबास प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात आली.
यावेळी तहसिलदार संतोष कणसे, सर्व ऐवळे कुटुंबीय आणि महिम गावातील प्रमुख मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

