चिंचणी प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर सोशल फाउंडेशन व चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आ. सुभाष बापू देशमुख यांच्या संकल्पनेतून चिंचणी येथे 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन ते 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती या कालावधीत पर्यटन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे.
तरी या पर्यटन सप्ताहामध्ये चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राच्या वतीने वेगवेगळे उपक्रम घेण्यात आलेले आहेत. यामध्ये निबंध स्पर्धा, पर्यावरण दिंडी, महिलांचे पारंपारिक खेळ, जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना बाल चित्रपट महोत्सव, भजन, कीर्तन, भारुड, वृक्ष लागवड, स्वच्छता मोहीम, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा आणि परिसंवाद इत्यादी भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी राहणार आहे.
या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. या पर्यटन सप्ताहामध्ये चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राच्या वतीने जेवणावर व ग्रामीण खाद्यपदावर विशेष सवलत दिली जाणार आहे.
या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी मोफत बैलगाडी फेरी, ई - कार सवारी, जादूचे प्रयोग ठेवण्यात आलेली आहेत. हा पर्यटन सप्ताह भरगच्च अशा सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम घेऊन साजरा होत आहे. ग्रामीण भागातील हा बहुदा पहिला पर्यटन सप्ताह असावा तरी आपण या पर्यटन सप्ताहास आवश्यक भेट द्यावी अशी चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे.


