पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नवरात्रीच्या पावन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाई देवी मंदिर, श्री यल्लामा देवी मंदिर, श्री यमाई तुकाई देवी मंदिर, श्री पद्मावती देवी मंदिर, श्री रेणूकमाता मंदिर, श्री शाकंबरी देवी मंदिर आणि श्री लखुबाई देवी मंदिर येथे भाविकांना विशेष प्रसाद म्हणून नायलॉन शाबुदाणा वाटप करण्यात आले.
या प्रसंगी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे, सदस्य संभाजी शिंदे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, विभाग प्रमुख अतुल बक्षी व सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.
विविध परिवार देवता मंदिरांमध्ये आयोजित या विशेष प्रसाद वाटप कार्यक्रमामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. नवरात्रीच्या उत्सवात भाविकांची उत्स्फूर्त गर्दी लक्षात घेता समितीने ही सेवा उपलब्ध करून दिली. मंदिर परिसरात भक्तीभावाने केलेल्या दर्शन, देवीचा गजर आणि प्रसाद वाटपामुळे उत्सव अधिक भक्तिमय स्वरूपात साजरा झाला.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन व सोयी-सुविधांचे सर्वत्र कौतुक झाले, तर भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घेतला.