मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
राज्यातील माध्यमिक शाळेमधील ३ऑगष्ट २००६ च्या जी. आर. नुसार पूर्णवेळ झालेल्या ग्रंथपालांना समान टप्प्याची वेतननिश्चिती दि.७ नोव्हेंबर २०२३ च्या जी .आर .नुसार उन्नयन झाल्यापासून करुन मिळण्याकरीता व सेवानिवृत्त झालेल्या ग्रंथपालांचे रितसर प्रस्ताव महालेखापालांना (ए.जी) सादर करण्याबाबद शिक्षक आमदार किशोर दराडे साहेबांचे अहिल्यनगर येथे झालेल्या शिक्षक दरबारात मी श्री .उल्हास देव्हारे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शाळा ग्रंथपाल समिती या नात्याने लक्ष वेधले आहे.
लवकरच यावर अभ्यास करुन समस्या सोडविली जाईल असे आश्वासन आ. दराडे साहेबांनी दिले यावर जिल्हा शिक्षणाधिकारी मॅडम व वेतन अधिक्षक साहेबांनी दिले आहे , जर शालेय ग्रंथपालांच्या समस्या सोडविल्या जात नसेल तर येत्या २ ऑक्टोंबर २०२५ पासून पूणे येथील शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर आमरण उपोषनाचा इशारा दिलेला आहे. निवेदनात पुढे म्हटलेले आहे कि शासनानेच २००६ व २०२३ चे शालेय ग्रंथपालांचे दोन गट निर्माण केले आहे, त्यातील सेवाजेष्ट २००६ ग्रंथपालांना कमी पगार व २०२३ च्या ग्रंथपालांना जास्त पगार दिसुन येतो अशी तफावत निर्माण झालेली आहे.
या बाबद मुख्यमंत्री देवेंन्द्रजी फडनवीस , उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , अजित दादा पवार , शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे , जलसंधारण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. पदवीधर आमदार सत्यजीत तांबे व आमदार किशोरभाऊ दराडे यांचे अनेकवेळा निवेदन देउन व शिक्षण विभागाच्या अधिका-यांशी चर्चा करुन हा प्रश्न जवळ जवळ सुटु शकतो असे आश्वाशीत होत आहे.
वेतन अधिक्षक साहेबांना शिक्षण संचालकांनी निर्देश २४ जुलै २०२५ चे पत्र दाखवुन जर समान वेतन निश्चिती केल्यास किती आर्थीक भार येतो यांचे प्रस्ताव त्वरीत २००६ च्या ग्रंथपालांनी सादर करावेत त्या शिवाय माहे सप्टेंबर २०२५ पगार बील संबंधीत मुख्याध्यापकाडुन स्वीकारु नये असेही देव्हारे सरांनी विनंती केली व अधीक्षकांना माहिती दिली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा परिषद अहिल्यानगर सभागृहात अनेक मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनिल पंडीत सर , पवार सर, आप्पासाहेब शिंदे सर ,महेंद्र हिंगे सर , दरेकर सर, सेवानिवृत्त ग्रंथपाल किशोर नवगिरे सर, कैलास शिंदे सर , सौ. छाया घाटकर मॅडम आदि शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

