पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज सकाळी आम्ही दोन तास कामातून वेळ काढून नदीपात्र स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमात नगरपरिषद प्रशासनाची साथ आणि पंढरपूर सायकल्स क्लबच्या प्रत्येक सदस्याचा उत्साह प्रेरणादायी होता.
म्हणून चला, आता आपण ठरवूया –
आता पुढे घरात शाडू किंवा मातीचेच गणपती आणू.
नदीपात्र आणि विसर्जन स्थळं स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवू.
आणि खऱ्या अर्थाने निसर्गमित्र गणेशोत्सव साजरा करू.
या उपक्रमामध्ये श्रीकांत बडवे , प्रकाश शेटे , संतोष कवडे , महेश भोसले , अनिकेत गोंजारी , प्रवीण परचंडराव , शिवाजी शिंदे , डॉक्टर संभाजी भोसले ,आर्किटेक्चर,आशिष शेटे साहेब , प्रशांत मोरे , .खडके सर आणि आमचे छोटे कार्यकर्ते प्रकाश शेटे सरांची दोन मुले नंदन मुलगी सार्थकी व आर्किटेक्चर शेटे सरांचा मुलगा प्रणम्य यांनी अगदी उत्स्फूर्त व मोलाचे योगदान दिले त्याबद्दल त्या सर्वांचे मी पंढरपूर सायकल ग्रुप तर्फे धन्यवाद व्यक्त करतो तुमच्या सर्वांचे सहकार्य असेच राहो व असे सामाजिक उपक्रम आपल्या हातून घडत राहो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना व्यक्त करतो.

